बंद घर फोडून मुद्देमाल लंपास; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील  वाघनगर भागातील  जिजाऊ नगरमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश खिवराज लखारा (वय ३५, रा. जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार जळगाव) हे कुटुंबियासह राहतात. सोनार काम करून उदरनिर्वाह करतात. २८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान ते दिवाळी निमित्त एक महिन्यासाठी गावाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. बंद घर पाहून संधी साधत घराचे कडी कोयंडा तोडून घरातील ३७ हजार ६०० रूपयांचे दागिने आणि ६ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना  २९ नोव्हेंबर रोजी उघडकीला आली.

याप्रकरणी दिनेश लखारा यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिश हाळनोर करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.