गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून रोकड लंपास

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरीजवळ असलेल्या बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील ३१ हजार ८०० रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव रोडवर बजाज गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एजन्सीचे बंद कार्यालय अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील कॅबिनमधील ड्राव्हरमध्ये ठेवलेले ३१ हजार ८०० रूपये चोरून नेल्याचे उघडकीला आहे.

याप्रकरणी बजाज एजन्सीचे व्यवस्थापक अशोक किसनचंद छाबडिया (वय ५६, रा. पवार वाडी, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राहूल सोनवणे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.