प्रताप महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दि.06 ऑक्टोबर रोजी विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अमळनेर व वनपरिक्षेत्र पारोळा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोंबर २०२१ निमित्ताने प्रबोधन आणि जागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे हे होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने विवेक देसाई यांनी पीपीटीच्या माध्यमातून आपल्या प्रात्यक्षिकात  ‘बिबट’ अर्थात बिबट्या या हिंस्र प्राण्याविषयी संपूर्ण माहिती देऊन त्याची वैशिष्ट्ये नमूद केली. त्यानंतर बिबट या प्राण्यांविषयी सामान्य जनमाणसात असलेली भीती व गैरसमज या विषयी माहिती देऊन बिबट या प्राण्यापासून आपण स्वतःचे व इतरांचे संरक्षण कशा व कोणत्या पद्धतीने करता येईल तसेच प्रसंगी कशी काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भातही सखोल माहिती दिली. भविष्यात निश्चितच या माहितीचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल.

सदरील  कार्यक्रमासाठी पारोळा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एस.बी.देसले उपस्थित होते. त्याचप्रमाणे अमळनेर वनपरिक्षेत्राचे वनपाल साळुंखे, पी. जे. सोनवणे व  पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रताप महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संदीप नेरकर  यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश पाटील  यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.