वाकडी येथे बैलाच्या अंगावर विज पडून बैल जागीच ठार

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील वाकडी येथे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता भगवान सिताराम पाटील या शेतकऱ्यांच्या बांधावर बांधलेल्या एक लाख दहा हजार किमतीच्या  बैलावर विज पडून बैल जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली.

  गावावर संकटाची मालीका सुरूच 

चाळीसगाव तालुक्यातील वाकडी हे एक आदर्श शेती व्यवसाय म्हणून गाव ओळखले जाते.  शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हे वाकडी गाव असून   आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करणारे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुध्दा  चांगल्या प्रमाणात चालतो. चाळीसगाव शहर जवळ असल्याने दुधाची हात विक्री शहरात केली जाते. तसेच गावात बांधकाम करनारे व्यावसायिक सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत.

परंतु गेल्या  दिड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी  पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.  नदीला आलेल्या महापुराने नदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांचे  फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरेढोरे, दुभती जनावरे महापुरात वाहून गेल्याने सर्व अहंकार उडाला होता. अनेकांची नदी किनारी असलेली शेती पिकांसह वाहून गेली, अनेकांची घरं पडली.  तालुक्यात सर्वात जास्त नुकसान वाकडी गावात झाले आहे. शासनाने अधिकारी आले. लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी आलेत पंचनामे करून गेली.  परंतु शासनाची मदत अध्याप पर्यंत मिळालेले नाही.  तालुक्याचे लोकप्रिय आमदार वाकडी गावचे भाचे यांनी व स्वतः खर्च करून गरीब व निर्धार कुटुंबांना घरं बांधून दिली.  गरीबांना संसार उपयोगी वस्तू दिल्यात महापुराच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासकीय यंत्रणेच्या अधिकारी वर्गाला बोलावून  तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्यात आले.

या  संकटातून गाव बाहेर पडत नाही तोवर परत दिनांक ६ आकटोंबर २०२१ बुधवार रोजी विजेचा कडकडाट होऊन संध्याकाळी सहा वाजता वाकडी गावातील कष्टकरी शेतकरी भगवान सिताराम पाटील यांच्या बैलांच्या अंगावर विज पडून त्यांचा एक लाख दहा हजार किमतीचा बैल शेताच्या बांधावर जागीच ठार झाला.  अत्यंत दुःखदायक घटना घडली संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत असून गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  सरपंच प्रकाश पाटील यांनी  संबंधित शेतकऱ्याला धिर देऊन मनोधैर्य खचू नये म्हणून सर्व परीने  शासन दरबारी मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.