प्रताप महाविद्यालयात ऑनलाईन वर्ग सुरू ; चेअरमन योगेश मुंदडेंची संकल्पना

0

अमळनेर(प्रतिनिधी) : येथील खा.शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत.इयत्ता १२ वी च्या शास्त्र, कला व वाणिज्य शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी घरी बसून व्हिडिओ लेक्चर तयार केले असून ते व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे.

कोविड १९ च्या प्रश्वभूमीवर सध्या शिक्षक व विधर्थ्यांना सुट्टी आहे. त्याचा सदुपयोग करता यावा म्हणून खा.शि.मंडळाचे चेअरमन योगेश मुंदडे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाने सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्राचार्य ज्योती राणे यांचेही यासाठी मार्गदर्शन लाभत आहे.या परिस्थितीत व उपलब्ध साधन सामग्रीतुन सदर व्हिडिओ बनवले जात असून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ही पुढे सरकतो आहे व वेळही वाया जात नाहीये.

सदर उपक्रमाचा विद्यार्थी लाभ घेत आहेत, उपक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य पी.आर.भुतडा, पर्यवेक्षक पी.आर.भावसार, प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल व सर्वच शिक्षक परिश्रम घेत आहेत.
लवकरच कला व वाणिज्य तसेच किमान कौशल्य ह्या शाखांचे देखील ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.