पॉझिटीव्ह पेशंटचा छोटा एरिया वगळता अमळनेर शहर खुले होणार !

0

अमळनेर (प्रतिनिधी) : आमदार अनिल पाटील यांनी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली असून आज दि 23 पासून होणार अमळनेर खुले होणार असून अमळनेर शहरातील पॉझिटीव्ह पेशंटचा छोटा एरिया वगळता इतर सर्व शहर खुले होणार आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून ज्यांचा काही कोरोनाशी संबंध नाही अशा नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. जीवनाश्यक वस्तूंपासून नागरिक व व्यावसायिक उपेक्षित आहेत हे सर्व परिस्थिती पाहता व शहरातील कोरोना ची परिस्थिती पाहता शहरात केवळ एक एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून त्याच्या कुटुंबातील 12 सदस्य कोव्हीड सेंटरला ठेवण्यात आलेले आहे कन्टोनमेंट झोन मधून आता इतर झोन काढून टाकण्यात येणार आहेत. शहरातील दोन-तीन किलोमीटर एरिया एकाच भागात असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सर्व गंभीर परिस्थिती पाहता आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपल्या गाऱ्हाणे मांडले व येथील परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी हिरवा कंदील दाखवला असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली व स्थानिक अधिकार्‍यांशी देखील त्याबाबत चर्चा केली असून त्यांची लवकरच बैठक होणार आहे.

व्यवसायिकांची होत असलेली उपासमार झालेले ठप्प व्यवहार पाहता केवळ रेड झोन असलेली छोटा एरीया प्रतिबंधित क्षेत्र म्हणून करण्यात येणार असून इतर सर्व भाग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. त्याच बरोबर नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावे अन्यथा त्यांच्यावर आणि वितरकांवर गंभीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला आहे त्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स सॅनिटायझर याचा वापर करुन ग्राहक व विक्रेते यांनी देखील स्वतःपासून सुरक्षित राहावे अशी सूचना केली आहे.

सर्व व्यवसाय होणार खुले शहरातील सर्व किरकोळ व्यवसायिक यांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी होती सुरू झाली होती त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती हेच ही सर्व पाहता आमदार अनिल पाटील यांनी निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.