भुसावळातील खाजगी दवाखाने सुरू करा ; युवासेना समन्वयक स्वप्निल पवार यांची मागणी

0

भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले असून या संकटातून केवळ डॉक्टर्स,बाहेर काढू शकतात. वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसूकच भीती दूर होईल परंतु शहरातील शासकीय दवाखाने वगळता काही खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने नागरीकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सर्दी, ताप, खोकला मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरातील डॉक्टरांनी खाजगी रुग्णालये तसेच दवाखाने सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद ठेवणार्‍यावर कडक कारवाई करावी.

शहरातील खाजगी रुग्णालये व ओपीडी बंदमुळे नागरीक औषधाच्या दुकानात जावून स्वत:च औषधी खरेदी करती आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यांच्यावरील ताण वाढली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम 2020 साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी भुसावळ युवासेना शहर समन्वयक स्वप्निल पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.