पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो; भाजपच्या नेत्याचं अजब विधान

0

भोपाळ : नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधात सर्वपक्षीयकडून विरोध केला जात असून कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या मुद्दाबाबत बोलत असताना  भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी अजब विधान केल आहे. पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो, असा अजब दावा विजयवर्गीय यांनी केला आहे. इंदौरमध्ये एका सभेला ते संबोधित करत होते.

माझ्या घरी एका खोलीचं काम सुरू होतं. त्यासाठी जे मजूर आले होते त्यांची खाण्याची पद्धत पाहून मला थोडं विचित्र वाटलं. ते फक्त पोहे खात होते, मी त्यांच्या मुकादमाला विचारलं की हे बांग्लादेशी आहेत का ? यानंतर दिवसांनी ते सगळे मजूर कामावर आलेच नाहीत विजयवर्गीय यांनी सांगितले की त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाहीये. ‘मी सगळ्यांना सतर्क करतोय कारण देशांतर्गत सुरक्षेला हा मोठा धोका आहे. असं ही ते म्हणाले आहे.

दरम्यान, विजयवर्गीय यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दर्शवला. हा कायदा राष्ट्रहितार्थ असल्याचं ते म्हणाले. सीएए अस्सल निर्वासितांना नागरिकत्व देईल आणि घुसखोरांना ओळखेल, असा दावाही त्यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.