कापुस व्यापरीकडून शेतकऱ्याची फसवणुक

0

वरणगाव : शेवटच्या टप्प्यातील वेचलेला शेतातील कापूस शेतकऱ्याने व्यापाऱ्याला विकला होता. मात्र, कापुस मोजताना व्यापाऱ्याच्या मनात मापात पाप आल्याने शेतकऱ्यानेच त्याचा पर्दाफाश केल्याची घटना गुरुवार रोजी उघडकिस आली.

या बाबत वृत असे की, शहरातील शेतकरी प्रकाश चौधरी यांना आपल्या मालकीचा कापुस जामनेर येथील व्यापाऱ्या बुधवार रोजी विकला होता. बाजार भावा पेक्षा दोन शे रुपयाने जादा भाव मिळत असल्याने चौधरी यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मेव्हणा राजु आत्माराम चौधरी यास कापसाच्या भावाचा फरक सागत यांच व्यापाऱ्याला कापुस विकत देण्यास सागीतले मात्र जामनेरच्या व्यापाऱ्याने कापुस मोजण्यास सुरुवात करुण दोन, तीन कापसाचे तोल लवकर लवकर मोजुन गाडीत टाकत असल्यान व प्रत्येक तोलाच्या मागे दहा ते पंधरा किलोचा फरक जाणवत असल्यान शेतकरी यांच्या लक्षात आल्यान व्यापऱ्यास पुन्हः कापुस मोजण्याचा हट्ट धरल्याने व्यापऱ्याची व सोबतच्या त्याच्या माणसाची चांगलीच तारबंळ उडाली व त्या जागेवरून त्याने पळ काढला होता. मात्र त्याला थोडच वेळेने शोधुन परत त्या ठिकणी आणले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व सदस्यास वरिल प्रकार सागीतला असता पुन्हा कापुस मोजला तेव्हा मोजण्याचा फरक जाणवल्यान शेतकरी आक्रमक होऊन आपली फसवणुक झाल्याने व्यापाऱ्यास पोलीसाच्या स्वाधीन करण्याची भुमीका घेतली होती. मात्र शटरातील काही प्रतिष्ठित मंडळीणी हा प्रकार मिटवला आधीच शेतकरी यंदा झालेल्या अति पावसाने कपाशी सह अनेक पिकाचे नुकसान झाल्यान शेतकरी नापीक मुळे भरडला गेला जेमतेम झालेल्या पिकावर शेतकरी समाधानी मात्र अशा प्रकारे व्यापाऱ्या कडून फसवणुक होत असल्याने त्यांनी जावे कुणाकडे असा प्रश्र निर्माण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.