आपके फोन टॅप हो रहे है, भाजपच्या मंत्र्यानेच दिली माहिती – संजय राऊत

0

मुंबई : भाजपच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा खळबळजनक दावा शिवसेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केले होते, असा आरोप झाल्यानंतर राऊतांनी आता ट्विटरवरुन हा दावा केला आहे.


महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत यांनी त्यांचे फोनकॉल टॅपिंगचा दावा केला आहे. ‘आपके फोन टैप हो रहे है. ये जानकारी मुझे भाजपा एक वरिष्ठ मंत्रीने भी दे रखी थी. मैने कहां था..भाई साहेब..मेरी बात अगर कोई सुनना चाहता है. तो स्वागत है..मै बाळासाहेब ठाकरेजी का चेला हूं. कोई बात या काम छुप छुपकर नही करता..सुनो मेरी बात..’ संजय राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.