पोलीस कॉलनीत एका २७ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव, प्रतिनिधी  

जळगाव  शहरातील पोलीस कॉलनी येथे  एका २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नजमा बी जुबेर खाटीख (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

शहरातील पोलीस कॉलनी अजीम किराणा जवळ नजमा खाटीख यांनी आज सकाळच्या  सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. नीता भोडे यांनी मयत घोषित केले.  या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एपीआय अमोल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.