पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा इंधन दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग २५ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

 

आज सिंगापूरमध्ये कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.३ टक्क्यांनी वधारले आहेत. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव ४०.५८ डॉलर प्रति बॅरल आहे. अमेरिकेतसुद्धा तेलाचा भाव वाढला. सोमवारी कच्चे तेल प्रती बॅरल ३८.६९ डाॅलरवर बंद झाले. त्यात १३ सेंटसची वाढ झाली. उत्पादन कपातीमुळे तेलाला काहीसा आधार मिळेल.

 

युरोप व उत्तर अमेरिकेतील विषाणू प्रसार व लॉकडाऊन स्थइतीमुळे तेलाच्या अर्थकारणावर परिणाम होऊन दरांवर आणखी दबाव आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.