एरंडोल- नाशिक बस ग्रामीण भागासाठी लाभदायक : आ.चिमणराव पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी) : आज पासून सुरु करण्यात आलेली एरंडोल ते नाशिक ह्या बसचा फायदा देवगाव,तामसवाडी, बोळे सारख्या मोठ्या गावांना होणार असून प्रवाश्याच्या मागणीनुसार वेळोवेळी पाठपुरावा करून ही बस सुरू केल्याचे पारोळा बस स्थानकात एरंडोल नाशिक बसच्या शुभारंभ व पूजन प्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे संचालक चतुर भाऊसाहेब, शेतकी संघाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे,म्हसवे सरपंच सतीश संदांनशिव, जिजाबराव पाटील, सखाराम चौधरी, बाळू पाटील शिरसमणी, राजू पाटील वेल्हाणे, शिरसमणी उपसरपंच चेतन पाटील, समाधान मगर, पंकज मराठे, राजू पाटील, आबा महाजन, सावंत शिंपी, शुभम बोरसे, योगेश लोहार, दीपक शिंपी, नाना सपकाळे, निंबा चौधरी, यासह पारोळा कंट्रोलर बीएन वाघ, एरंडोल कंट्रोलर ए आर वाणी,बस वाहक ए डी लोहार,बस चालक गोरख महाजन, बंडू नाना पाटील यासह बस चालक वाहक व प्रवासी उपस्थित होते.

 

एरंडोल, पारोळा, देवगाव, तामसवाडी,बोळे, शिरूड चौफुली, आर्वी, मालेगाव, नाशिक असा या बसचा प्रवास असणार आहे.पारोळा येथून ही बस दुपारी ३: ०० वाजेला निघेल याबसमुळे तामसवाडी,देवगाव,बोळे व परिसरातील गावांना फायदा होऊन नाशिक जाण्यासाठी पारोळा यावे लागत होते आता नाशिक जाण्याकरिता गावातील बसस्टॉपवर बस आल्याने प्रावाश्यानी आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानलेत.

 

या एरंडोल नाशिक बससाठी आमदार पाटील यांनी प्रवाश्याच्या मागणी वरून डेपो मॅनेजर जळगाव यांच्या शी बोलून त्या बसचा मार्ग एरंडोल, पारोळा, देवगाव, तामसवाडी, शिरूड चौफुली आर्वी मालेगाव नाशिक असा बदल करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यात त्यांना यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.