पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : आज बुधवारी सलग २६ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. तीन आठवड्यांहून अधिक काळ इंधन दर ‘जैसे थे’च आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तर देशांतर्गत इंधन दर स्थिर असल्याने तूर्त ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

 

युरोप आणि उत्तर अमेरिकेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आले. परिणामी आधीच विस्कळीत झालेल्या जागतिक तेल बाजारात आणखी अडथळे निर्माण झाले. परिणामी तेलाचे दर आणखी घसरले. नव्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे तेलाच्या मागणीवर आणखी दबाव आले आहेत. कोव्हिड-१९ रुग्णांमध्ये आणखी वाढ तसेच लिबियातील वाढीव उत्पादन यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले.

 

पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी सलग २६ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

 

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली होती. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले होते. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.

Leave A Reply

Your email address will not be published.