डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूतळा व चौक सुशोभीकरणाचे उद्घाटन

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील आंबेडकर चौक येथे जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून नगरसेविका व चाळीसगाव नगरपालिकेच्या आरोग्य सभापती तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ सायली रोशन जाधव यांच्या पाठपुराव्याने एक कोटी 33 लाख लाख खर्च असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे शुभोभिकरण व नूतनीकरण  विकासकामांचा प्रारंभ व पायाभरणी नुकतेच भन्तेजी गण, यांच्या शुभ हस्ते पार पडला.

यावेळी जळगाव लोकसभेचे  खासदार  उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण ,चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ आशालता चव्हाण, जिल्हा देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीप दादा देशमुख, चाळीसगाव तालुका विकास सहकारी ग्राम उद्योग संस्थेचे चेअरमन दैनिक ग्रामस्थ चे संपादक श्री किसनराव जोर्वेकर, समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्म भूषण बागुल ,न.पा. गटनेते संजय रतन सिंग पाटील, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक व भिमाचा किल्ला जिमखान्याचे संस्थापक-अध्यक्ष रोशनभाऊ जाधव, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, तहसीलदार अमोल मोरे, जनआंदोलन खानदेश समितीचे प्रमुख प्रा. गौतम निकम, चाळीसगाव पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील ,तेली समाजाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर दिलीप चौधरी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव ,मंगेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य भुषण पाटील ,मार्केट कमिटीचे माजी सभापती सरदार सिंग राजपूत, चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भोजराज शेठ पून्शी, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी पी बाविस्कर, चाळीसगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी पाटील ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश पाटील ,मेहुनबारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे ,नगरसेवक रामचंद्र जाधव ,राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, शेखर बजाज, आनंदा कोळी ,सुरेश हरदार चौधरी ,शहर सेनाप्रमुख नाना कुमावत, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील ,शेख चिराखउद्दीन, चंद्रकांत तायडे ,अरुण अहिरे ,नगरसेविका श्रीमती वत्सला महाले, सौ वैशाली मोरे, माजी नगरसेवक बाळू मोरे, काका घोडे ,कालिदास आहिरे ,दादासाहेब डी डी  चव्हाण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश चव्हाण, गौतम झाल्टे, एडवोकेट राहुल जाधव ,बबलू जाधव मुकेश नेतकर ,प्रवीण जाधव, गौतम जाधव, दिनेश मोरे ,किरण जाधव, प्रभाकर पारवे ,सुरेश खेडकर ,बापू पवार ( गुरुजी) आदी मान्यवर व व समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश नेतकर आणि सौ सोनाली लोखंडे यांनी केले तर प्रास्ताविक रामचंद्र जाधव यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत चाळीसगाव नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ सायली जाधव व रोशन जाधव यांनी केले

यावेळी खासदार  उन्मेष पाटील ,आमदार मंगेश चव्हाण ,माजी आमदार साहेबराव घोडे ,प्रदीप दादा देशमुख ,नानासाहेब धर्म भूषण बागुल, किसनराव जोर्वेकर ,यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

सौ सायली जाधव ह्या नगरपालिकेच्या पहिल्या आरोग्य सभापती आहे ज्यांनी आपल्या कार्यकाळात चाळीसगाव शहर स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले. आणि स्वच्छतेच्या कामात त्यांनी व त्यांच्या पतीने सक्रिय योगदान दिले विशेष म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभित आणि नूतनीकरणासाठी एक कोटी 33 लाख रुपयाचा निधी आणणाऱ्या त्या पहिल्या आरोग्य सभापती असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषेत सांगितले विशेष म्हणजे सायली जाधव यांनी खासदार ,आमदार, नगरपालिका अध्यक्षा व नगरसेवक यांच्या सहकार्याने एवढे मोठे काम केल्याबद्दल त्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.