लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाने केली महिला शिक्षिकेची फसवणूक ; गुन्हा दाखल

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल- तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक महावीर गोविंदराव भिंगोले यांनी 2 ऑक्टोबर 2016 ते 23ऑगस्ट 2019 पावेतो महिला शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले याबाबत तत्कालीन महिला शिक्षिकेने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून 27 ऑक्टोबर 20 20 रोजी दुपारी सदर मुख्याध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी घुणास्पत विकृतीची ही घटना आहे.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की महावीर गोविंदराव भिंगोले हे नंदगाव येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते ते अष्टविनायक कॉलनी मध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होते त्यांच्या शाळेत नोकरीला असलेल्या एका महिला शिक्षिकेला ते स्वतः विवाहित असताना त्यांना त्यांनी महिला शिक्षिकेला खोट्या लग्नाची बतावणी करून व लग्नाचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेशी वेळोवेळी शारीरिक संबंध व अनैसर्गिक संभोग करून संभोगाचे फोटो व व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये काढले असा आरोप फिर्यादी महिला शिक्षिकेने केला आहे.

24 ऑगस्ट 2019 रोजी शिर्डी येथे लग्न करावयाचे आहे असे सांगून या महाभागाने शिक्षिकेला शिर्डी येथे भोलावले व साईबाबा चे मंदिराचे चांवळी जवळ असलेल्या हॉटेल वर्धमान मधील खोली क्रमांक 203 मध्ये देऊन शारीरिक संबंध केले तुझे कोणाशी लग्न होऊ देणार नाही असे महिला शिक्षिकेला सांगण्यात आले तसेच महिला शिक्षक असलेले पैसे व एटीएम कार्ड करून घेण्यात आले.

याप्रकरणी अंडर पोलीस स्टेशनला भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 68/20 भादवि कलम 376,377,417 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, मिलिंद कुमावत हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.