पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगभरात थैमान घेतलेल्या कोरोना विषाणूमुळे राज्यातील अनेक मुलांनी पालक गमावले आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत.  त्यांच्यासाठी 100 टक्के शुल्क माफ करण्यात आले असल्याचे विद्यापिठातर्फे सांगण्यात आले आहे.  सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फी मध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.

सदर समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता. त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापिठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले. दरम्यान या  काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत.  त्यांना फीमध्ये 100 टक्के सवलत देण्यात आली आहे.  सदर  फीमध्ये कपात केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह/ निवास शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.