पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने संभ्रम

0

चिनावल, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

चिनावलसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत रितसर अर्ज करुनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही सदर रक्कम जमा होत नसल्याने वंचित शेतकरी संभ्रमात पडले आहे.

सदर योजनेचा लाभ व पात्र असल्याचा कन्फर्मेशन मेसेज येवूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही केंद्र सरकारची शेतकऱ्याप्रति असलेली सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी सैरभैर झाले आहे. एका शेतकऱ्यांचे रक्कम खात्यात जमा होत असताना आपली का नाही? यासाठी शेतकरी तलाठी कार्यालय, सेतू केंद्र, बँक, तहसील कार्यालयाच्या खेटा मारत आहे.

मात्र या योजनेची साईड वरूनच बंद असल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत फिरावे लागत आहे. संबंधित विभाग, बँक यांच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ज्या शेतकऱ्यांची रक्कम खात्यात जमा झाली नाही त्यांच्यासाठी काही समस्या असल्यास मार्गदर्शन अथवा दुरूस्ती कॅम्प राबवून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी जोरदार मागणी वंचित शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.