स्पंदन अकोलेचे यश

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्पंदन पराग अकोले (वय 13, रा. डी.एस.के. विश्व, धायरी, पुणे) याने नुकत्याच पोरबंदर, गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत 6 ते 14 वर्षे वयोगटात 1 किलोमिटर सागरी जलतरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तो गेली 5 वर्षे जलतरणाचा सराव करीत असून आतापर्यंत त्याने 9 मेडल्स्‌ मिळविलेले आहेत व जवळपास 50 पेक्षा अधिक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.