पालवे खून प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक

0

जळगाव – एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे सागर रमेश पालवे या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करीत आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर उर्फ पिंटु बिजलाल बोदडे (वय ४० वर्षे, रा. अष्टमी कॉलनी, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर), निलेश रोहिदास गुळवे (वय २२ वर्षे, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) अशांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आराम करण्याच्या रुममध्ये मयत सागर पालवे याला लाठया काठयांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्यास झालेल्या गंभीर दुखापतीत तो मयत झाला होता. म्हणुन सदर बाबतीत मयत सागर याची आई  निलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यात मयत सागर यास मारहाण करतेवेळी सदर ट्रान्सपोर्टवरील चालक रतन पंडित माळी रा. मुक्ताईनगर हा देखील असल्याची माहिती मिळाली होती व त्याने देखील मारहाण केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यांनी तिघांनी मिळून केलेल्या मारहाणीत सागर याचा मृत्यू झाला होता. म्हणून रतन यास काल रात्री मुक्ताईनगर येथून ताब्यात घेतले होते व त्याने मारहाण केल्याचे कबूल केले होते. त्याला अटक करण्यात येऊन आज रविवारी रोजी न्यायमुर्ती जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. १२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे, पोउनि/ निलेश गोसावी, सफौ/अतुल वंजारी, सुधील साळवे, ईम्रान संदीप धनगर ललित नारखेडे,  राहुल रगडे, विशाल कोळी यांनी कारवाई केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/निलेश गोसावी, पोकॉ/संदीप धनगर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.