जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अविनाश आचार्य, बेंडाळे, हाजी गफ्फार मलिक सन्मानित

0

जळगाव:- – शहरासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व शहराचे नाव राज्यासह देशभरात गाजविणाऱ्या मान्यवरांना महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जळगावरत्न’ या पुरस्काराचे वितरण १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या प्रांगणात करण्यात आले. प्रसंगी अ‍ॅड. उज्वल निकम, प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांना, तर दिवंगत डॉ. अविनाश आचार्य व हाजी गफ्फार मलिक यांना मरणोत्तर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची होती. मंचावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते. सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांनी प्रस्तावनेतून पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांना “जळगावरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. दिवंगत डॉ. आचार्य यांच्या वतीने त्यांची कन्या डॉ. आरती हुजुरबाजार यांनी तर हाजी मलिक यांच्या वतीने एजाज मलिक यांनी पुरस्कार स्वीकारला.

यानंतर अरुणभाई गुजराथी यांनी मनोगतातून

जळगाव रत्नांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी महानगरपालिकेतील नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.