पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उदघाटन

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाण्यातील विठ्ठल मंदिर, कोपरीगाव, ठाणे पूर्व शेजारी उत्कृष्ट नगरसेविका सौ. मालती रमाकांत पाटील व  लोकनेते रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी कोपरी ग्रामस्थ आरोग्य केंद्राचे उदघाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी महापौर नरेश म्हस्के, आमदार रवी फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील, नम्रता हेमंत पमनानी, शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड, माजी नगरसेवक गिरीश राजे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, शाखाप्रमुख प्रशांत पाटील, भालचंद्र पाटील, मयूर ठाकूर, अवधूत कदम, अमित शिंदे, चिन्मय पाटील, धिरज पाटील तसेच सर्व शिवसैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आरोग्य केंद्रामधून कोपरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या केंद्रावर वर कोविड  लसीकरण केले जाणार असून कोपरीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लसिकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर या आरोग्य केंद्राचा कोपरी वासियांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  या आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील, असे यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.