सून्नी मुस्लिम बांधवांतर्फे सौदी अरेबिया शासनाचे तीव्र निषेध.. (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संपूर्ण जगभरातल्या मुस्लिम बांधवांचे अत्यंत महत्वपूर्ण सर्वात जास्त व प्रथम पवित्र धार्मिक स्थळ जेथे हज यात्रेला जातात त्या परम पवित्र मदिना – ए – मुनव्वरा येथे तिथली सौदी अरेबिया शासन चित्रपट गृह सुरू करणार असून इस्लाम धर्मात या गोष्टीला मनाई असून यामुळे जगभरातील तमाम मुस्लिम बांधवांचे धार्मिक भावना व मन दुखावले गेले असून हे एका प्रकारे पवित्र स्थळाची विटंबना आहे.

प्रत्येक मुस्लिमांचा एक स्वप्न असतो की त्याने जीवनात एकदा तरी प्रेषित हजरत मोहम्मद ( सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या पवित्र मजार – ए – अकदस म्हणजेच मस्जिदे नबवीचे दर्शन घ्यावे. मुस्लिमांना आपला जीव संपत्ती परिवारा पेक्षा प्रिय मदिना शहर असून त्या ठिकाणी कोणी चुकीचे करत असेल तर  जगभरातील  मुस्लिम बांधव आहे त्याचा नक्कीच विरोध व निषेध करतील.

म्हणूनच आज जळगाव शहरातील अहले सुन्नत वल  जमात सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे सौदी अरेबिया शासनाचे तीव्र निषेध करून परम पवित्र मदिना –  ए –  मुनव्वरा  येथे चित्रपटगृहे कोणत्याही स्थितीत सुरू करण्यात येऊ नये, यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी बंद करा बंद करा चित्रपटगृहे बंद करा,  मुर्दाबाद मुर्दाबाद सौदी अरेबिया शासन मुर्दाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या हातात स्टॉप सिनेमा हॉल इन मदिना शरीफ,  मदिना मदिना शरीफ मध्ये चित्रपटगृह नको नको नको…  असे फलक हाती घेतलेले होते.  याप्रसंगी सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करून निषेध केलेला आहे.  त्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्याद्वारे महामहीम राष्ट्रपती साहेब, महामहिम पंतप्रधान साहेब, महामहिम परराष्ट्रमंत्री साहेब भारत सरकार नवी दिल्ली तसेच मा राजू साहेब सौदी अरेबिया नवी दिल्ली यांना निवेदन पाठवण्यात आले असून त्यात मागणी करण्यात आलेली आहे की मदिना शरीफ मध्ये चित्रपट  गृहे उघडण्यात नये.

याप्रसंगी सुन्नी ईदगाह  ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मोईनुद्दीन काकर,  मुक्तार शहा, इक्बाल वजीर, शेख शफी,  सय्यद उमर, सिद्दिक मनियार, रईस शाह, जर्रार  अहमद, सलीम इस्माईल, नूर मोहम्मद, शकूर बादशहा, मेहबूब हुसेन, उस्मान अली,  जमीर उद्दीन शेख, शब्बीर युसुफ अरबाज हुसेन, फिरोज इक्बाल, रफिक पटेल, शेख वसीम, कामिल खान, सय्यद जावेद इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.