पारोळा येथे दुकानातून मोबाईलची चोरी

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथील बाजारपेठतील बाॅम्बे बुट हाऊसमधून अज्ञात चोरटयांनी मोबाईल लंपास करून पोबारा केला.

शहरातील बाजारपेठेतील बाॅम्बे बुट हाऊस येथून  मंगळवार दि. १६ रोजी दुपारी एक ते दिडच्या सुमारास काही लोक दुकाकानात ग्राहक बनुन आले व दुकानाच्या काउंटर वर विवो कंपनी चा y ३० हा  सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल यात ९४२३१५८६६५ हा एअरटेल कंपनीचा नंबर होता. अज्ञात चोरट्यानी तो चोरून नेल्याची तक्रार मोबाईल मालक अशोककुमार लालवाणी यांनी पारोळा ‌पोलिसात दिली आहे.

घटना घडताच काही मिनिटाच्या आत लालवाणी यांनी फोन लावताच फोन स्विच ऑफ  झाला असल्याची माहिती दिली.  मागील काही दिवसापासून बाजारपेठेत असे प्रकार वाढल्याचे दिसत आहेत. अनेक लोकांचे मोबाईल, पाकिट, सोनसाकळी,  मंगळसुत्र लंपास करत चोरटयांनी बाजारपेठेत धुमाकूळ घातली आहे.

अनेकदा अनेक जण पोलिसात तक्रार ही करित नाहीत, या चोरट्याचा पारोळा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.