पाचोऱ्यात पालकमंत्री/पाणंद रस्ते योजनेच्या फलकाचे प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

0

पाचोरा (प्रतिनिधी) –

ग्रामिण भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यांचे अतिक्रमण केलेले असल्याने या अतिक्रमणामुळे काही शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यास अडचण निर्माण होत असते. यासाठी शासनाने पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना आणली असून पखणंद रस्ते मोकळे करण्यासाठी व्यापक माहिती असलेल्या मार्गदर्शन पर फलकाचे अनावरण उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या हस्ते तहसिल कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, अॅड. अभय पाटील, निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे, महसुल नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, श्री. हटकर, तलाठी भरत गायकवाड, संभाजी पाटील, भरत परदेशी, कैलास बहिर, संदिपकुमार चव्हाण, नकुल काळकर, मयुर आगरकर, अविनाश लांडे उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी अतिक्रमित केलेले रस्ते मोकळे करण्यासाठी पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते ही योजना असुन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय, विभागीतस्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात येणार आहे. यात जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी, विभागीय स्तरावर उप विभागीय अधिकारी, तालुकास्तरावर तहसिलदार हे अध्यक्ष असुन ग्रामस्तरीय समितीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हे सदस्य असतील. योजना राबविण्याकरिता विविध यंत्रणेमध्ये सुसुत्रता व जबाबदाऱ्यांची  निश्चिती आवश्यक असल्याने विविध समित्या गठीत केल्या जातील.

ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यांचे अतिक्रमण केले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगणे आवश्यकता भासल्यास असे प्रकरणे तंटामुक्ती समिती समोर ठेवणे.व समिती मार्फत निकाली काढणे, रस्ते तयार करणेसाठी आवश्यकता भासल्यास गौण खनिज खाण पट्टयातुन दगड, मुरुम उपलब्ध करून देणे असे समित्यांचे कार्य असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.