दशकपूर्तीनंतरही सदोष दिशादर्शक फलक

0

सार्वजनिक बांधकाम विभागाने बेहंदी गावाचा लावला जावईशोध ; लोहारा गावास कासमपुरा गावाची उपमा
ज्ञानेश्वर राजपूत
लोहारा ता. पाचोरा ;- परिसराची माहिती नसणाऱ्या नवीन लोकांना चौफुलीवर मार्ग शोधण्यात अडचण येणार नाही यासाठी सम्पूर्ण राज्यात प्रत्येक चौफुलीवर दिशादर्शक व गाव किती किलोमीटर अंतरावर कोणत्या दिशेला आहे . असे फलक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावण्यात आले आहेत पण गावाच्या नावाची प्रत्यक्ष खात्री न करता अविचाराने लावलेले फलक हास्यास्पद ठरतात . याचे नमुने समोर येतात असा नमुना येथील लोहारा-जामनेर-शेंदुर्णी तिहेरी रस्त्यावर आहे . चौफुलीवर दिशादर्शक फलक आहे. यात ‘बेहंदी; गावाच्या बाबतीत घडला सार्वजनिक बांधकाम विभागाने बेहंदी गावाचे चुकीचे नामनिर्देशन फलक दिले आहे . या गावाचा परिसरात किंवा जिल्ह्यात कुठे उल्लेख नसताना नोंद दाखवली आहे . हा एक प्रकारे सार्वजनिक विभागाने लावलेला जावईशोध म्हणावा या नावाचा गावाचा काहीएक संबंध नसताना हा चुकीचा आहे किंवा बरोबर हे न तपासता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी केलेली चुकी आहे . याला जवळपास दशक-दिडदशकांचा कालावधी लोटला तरीही हा विभाग अनभिज्ञ असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. यामुळे परिसर व गावातील वाहनधारक आश्चर्य व्यक्त करतात .

या चुकीच्या दिशादर्शक नावाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर येऊन प्रतिमा मलिन होत आहे . अजूनही लोहारा गावी रविराज टुरिंग टॉकिज अर्थात पाचोरा चौफुलीवर कासमपुरा या गावाचा दिशादर्शक फलक आहे . कासमपुरा गावाच्या नावाखाली किंवा समोर दिशादर्शक बाण नाही किंवा किती किलोमीटर याची नोंद दिलेली नाही म्हणजेच हा फलकही लोहारा गावास कासमपुरा गावाची उपमा देत चुकीचा लावण्यात आलेला आहे . अर्थातच ज्यावर गावाचे नाव आहे व त्यावर दिशादर्शक बाण किती किलोमीटर हे दिलेले नाही. हे तेच गाव आले असे संबोधले जाते . या गावाच्या नावाने त्या स्थळी लोहारा गाव हे कासमपुरा आहे ,अस नविन लोकांना बुचकळ्यात टाकने होते म्हणजे या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार वरीष्ठ पातळीवरूनच पारदर्शक खात्रीपूर्वक नसून अनागोंदी करभरातून काम झाल्याची पुसटशी कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला आलेली नाही .
अनेक वर्ष अजून हे दिशादर्शक चुकीचे फलक किती वर्षाचा काळ राहणार? अजून किती ठिकाणी दिशादर्शक फलक चुकीचे आहेत याचे मंथन करून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल की , अजून शेवटपर्यंत ही फलक तसेच ठेवून कार्यप्रणाली विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन यातून टिकेचे धनी होऊ शकत आहेत.ह्या चुकीतून सार्वजनिक बांधकाम विभागाची देखरेख फक्त वरिष्ठ पातळीवरून ऑफिसमधुन कनिष्ठ पातळी कर्मचाऱ्याला सांग पाटला काय लिहु! अशा प्रकारचा कारभार पाहत आहे याची जाणीव झालेल्या चुकीतुन करून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.