पत्रकारास पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीची मागणी

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रीगोंदे तालुक्यात असलेल्या येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना एक लाख रुपयांची खंडणी मागण्यासह प्राणघातक हल्ला करणा-या सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलिस स्टेशनला पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7 सप्टेबर रोजी एकत्रीत आलेल्या सहा जणांनी पत्रकार प्रमोद आहेर यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके व बियरच्या बाटलीने मारहाण करण्यात आली होती. तसेच एक लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली होती. त्यातील दोघांनी आहेर यांच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी गावटी कट्टा लावत कुटुंबासह जीवे ठार करण्याची धमकी दिली होती. पत्रकार आहेर यांच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

पत्रकार प्रमोद आहेर यांच्यावर हल्ला करणारे वाळू तस्कर असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने या समाज विघातक कृत्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी केली आहे. हल्लेखोरांना तातडीने अटक झाली नाही तर पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.