पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच; जाणून घ्या योजनेबाबत..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ची घोषणा केली होती. सध्या देशातील 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. आज या मिशनचा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच केलं. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच केलं. या मोहिमेसाठी सरकारनं ऐतिहासिक करार केला आहे आणि याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असे आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर एक आधार प्रमाणेच नंबरही असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल.

मोदींनी तीन वर्षांपूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा केली होती. याच योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिम्मित आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणद्वारे राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान भारत डिजिटल मिशनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, युनिक हेल्थ आयडी अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा वैद्यकीय डेटा तयार केला जाईल. या आयडीच्या मदतीने त्या व्यक्तीचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड पाहिले जावू शकते. तो व्यक्ती कोणत्या डॉक्टरकडे गेल्यास त्याला हे आयडी दाखवावे लागेल. यामुळे डॉक्टरला संबंधित व्यक्तीचं संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड समजेल.

Leave A Reply

Your email address will not be published.