आज Google चा 23वा वाढदिवस; असा झाला गुगलचा प्रवास..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज 27 सप्टेंबरला गुगल आपला 23वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने गुगलने खास डूडल तयार करून, जगभरातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्तींबाबत आदर व्यक्त करण्याची गुगलची अनोखी शैली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त देखील गुगलने एक खास डूडल  तयार करून ते गुगलच्या होमपेजवर  शेअर केलं आहे.

आजच्या आधुनिक युगात इंटरनेट शिवाय आपला दिवसच जात नाही, खास करून गुगल..  आपण दिवसभरात अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर करतो. अशी एकही गोष्ट नसेल जी गुगलवर उपलब्ध नाही. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण गुगल करतो, जेणेकरून तो आधुनिक जगाचा गुरूच बनला आहे.  गुगल हे जगातील सर्वांत मोठं सर्च इंजिन आहे.

कसा झाला गुगलचा प्रवास.. 

गुगलच्या निर्मितीविषयी कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांच्या मनात सर्वप्रथम कल्पना आली होती. या कल्पनेवर काम करून 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी या सर्च इंजिनची निर्मिती केली. आता जरी हे सर्च इंजिन ‘गुगल’ नावाने जगप्रसिद्ध असले तरी हे काही त्याचं मूळ नाव नाही! त्याच्या निर्मात्यांनी सुरुवातीला त्याला ‘बॅकरब’ हे नाव दिलं होतं. यानंतर त्याचं ‘गुगल’ असे नामकरण करण्यात आलं. सध्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये गुगल वापरता येतं.

आतापर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी गुगलचा वाढदिवस साजरा झालेला आहे. 7 सप्टेंबर 2005 ला पहिल्यांदा गुगलचा वाढदिवस साजरा झाला होता. त्यानंतर ही तारीख बदलून कधी 8 सप्टेंबर झाली तर कधी 26 सप्टेंबर. सध्या 27 सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. यामागे सुद्धा एक खास कारणदेखील आहे. 27 सप्टेंबर या दिवशी गुगलने पेजेस सर्च करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे हाच दिवस वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. ​10 ऑगस्ट 2015 पासून सुंदर पिचाई यांची गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.

परिवर्तन करणं हा जसा मानवी स्वभाव आहे, तसाच  बदलत्या काळानुसार गुगलने देखील आपल्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. अनेक नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. यात महत्वाचं म्हणजे  स्थानिक भाषांचा समावेश केला गेला. सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक स्थानिक भाषांमध्ये गुगलवर माहिती उपलब्ध होते. यामध्ये भारतीय अनेक भाषांचा देखील समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.