नामांकित दुधात भेसळ; पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राईम ब्राँचने गोरेगाव परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे. नामांकित दुधाच्या पिशवीत अस्वच्छ पाण्याची भेसळ होत असल्याचं यावेळी पोलिसांना निदर्शनास आलं आहे. भेसळ  करणाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. ही टोळी नामांकित दुधाच्या पिशवीतून दूध काढते आणि त्यानंतर सीरिंजच्या मदतीने त्यात अस्वच्छ पाणी भरत आहेत.

कांदिवली गुन्हे शाखेच्या युनिट 11 ला या दूध भेसळ कऱणाऱ्या रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरेगाव येते छापा टाकला. यावेळी या दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी नामांकित दुधात दुषित पाणी मिसळून ते दूध हॉटेल आणि चहाच्या टपरीवर विक्री करत असत.

पोलिसांनी घटनास्थळावरुन एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्याचं नाव सैदुल बाकया कम्मापती असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 125 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठाही जप्त केला आहे. असं म्हटलं जात आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अशाच प्रकारे दुधात भेसळ करण्यात येत होती. अखेर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत दूध भेसळ कऱणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दुधात भेसळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीही उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड आणि गोरेगाव परिसरात पोलिसांनी छापा टाकून दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  केला आहे. जून महिन्यात पोलिसांनी ही कारवाई केली होती.

मुंबईत दूध भेसळ होत असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी मुंबईतील पश्चिम उपनगर असलेल्या मालाड आणि गोरेगाव परिसरात धाड टाकली. यावेळी घटनास्थळी ही टोळी दूध भेसळ करत असताना दिसून आली.

घटनास्थळावरून पोलिसांनी गोकुळ आणि अमुल यासारख्या नामांकित कंपन्यांच्या पिशव्या सुद्धा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी छापा टाकून जवळपास 90 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.