नवं संकट, ‘कोरोना’सह राज्यात आता माकड’ताप ; दोघांचा मृत्यू

0

मुंबई : राज्यामध्ये एकीकडे करोनाची दहशत असतानाच दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकडतापाचे संकट आलं आहे. माकडतापाने दोघांचा बळी घेतला आहे. दिनेश शांताराम देसाई (४५, रा. डेगवे – मोयझरवाडी) तर लक्ष्मण शिंदे (पडवे माजगाव) असे माकडतापाने बळी गेलेल्यांचे नाव आहे. दरम्यान, माकडतापाचे 3 महिन्यांत 18 रुग्ण आढळलेत.

या दोघांवरही गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान एका रुग्णा चार दिवसांपूर्वी तर एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनासह आता नागरिकांमध्ये माकडतापाबाबतही भीती निर्माण झाली आहे. या आजाराने दोघांचा बळी घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातल्या 8 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

माकडतापाची लक्षणे काय?
ताप, सांधेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा ही माडतापाची प्राथमिक लक्षणे आहेत. तसेच या आजारामध्ये ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते.

Leave A Reply

Your email address will not be published.