धक्कादायक… ‘बुल्लीबाई’ नंतर ‘सुल्ली डील्स’ अॅपचा २५ वर्षीय मास्टरमाइंड जाळ्यात.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवस पूर्वी बुल्लीबाई अॅप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीनहून अधिक जणांना अटक केली आहे. आता सुल्ली डील्स अॅप प्रकरणी मास्टरमाइंडला अटक केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केली आहे. त्याला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे.

बुल्लीबाइ अॅप  प्रकरणानंतर आता मुस्लिम महिलांच्या फोटोंचा ‘लिलाव’ असलेले ‘सुल्ली डील्स’  अॅप बनवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. आरोपी हा २५ वर्षीय तरुण असून त्याचे नाव ओंकारेश्वर ठाकूर आहे. तो इंदूरच्या न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा राहणारा आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली आहे. त्याने आयपीएस अकादमी इंदूरमधून बीसीए केले आहे.

ट्विटरवरील एका ट्रेड-ग्रुपचा सदस्य होता आणि मुस्लिम महिलांना बदनाम करण्यासाठी आणि ट्रोल करण्यासाठी विचार शेअर करत असे. त्याने गिटहबवर कोड विकसित केल्याची कबुलीही दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने दिली आहे.गिटहबवर ग्रुपच्या सर्व सदस्यांना अॅक्सेस होता. त्याने हे अॅप त्याच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे. ग्रुपमधील सदस्यांनी मुस्लिम महिलांचे फोटोही अपलोड केल्याचे त्याने सांगितले.

ओंकारेश्वरने जानेवारी २०२० मध्ये @gangescion या ट्विटर हँडलवरून ट्विटरवर एका ग्रुपमध्ये सामील झाला होता. या ग्रुपचे नाव ट्रेडमहासभा असे होते. या ग्रुपमध्ये मुस्लिम महिलांना ट्रोल करण्यासाठी चर्चा केली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.यानंतर त्याने गिटहबवर सुल्ली डील्स अॅप तयार केले. पण सुल्ली डील्सचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याने सर्व सोशल मीडियावरील फूटप्रिंट हटवले. त्याच्याकडे सापडलेल्या गॅजेट्सचा पोलीस तपास करत आहेत.गेल्या वर्षी लाँच झालेल्या ‘सुल्ली डील्स’ अॅपवर मुस्लिम महिलांची फोटो पोस्ट करून ‘लिलावा’साठी सूचीबद्ध करण्यात आले होते. चोरून काढलेल्या या फोटोंशी छेडछाड करण्यात आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.