धक्कादायक.. पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या पोटच्या मुलासह विहिरीत उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या म्हातोबाची आळंदी येथे घडली आहे. या घटनेमुळे  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतक महिलेचं वय ३० वर्षे होतं.

सदर मृत महिलेचे नाव कविता भोसले असून तिने आपल्या दोन वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत आई आणि मुलगा या दोघांचाही मृत्यू झाला. कविता भोसले या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील निवासी होत्या. कविता भोसले या आपल्या दोन वर्षांच्या मुलासोबत बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कविता भोसले आणि त्यांच्या दोन वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. कविता यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.