धक्कादायक.. काबुल बॉम्बस्फोटांत केरळच्या १४ लोकांचा संबंध, दोन पाकिस्तानी ताब्यात

0

काबुल, लोकशाही न्यूज नेटवर्क

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रॉव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेत केरळचे 14 लोक सामील असल्याची माहिती मिळाली आहे. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन प्रोविंस (ISKP) या दहशतवादी घेतली होती. दरम्यान, या संघटनेमध्ये केरळमधील १४ जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांना तालिबानने बगराम जेलमधून मुक्त केले होते. त्याशिवाय तुर्कमेनिस्तानच्या दुतावासावर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये १३ अमेरिकी सैनिकांसह २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार केरळमधील १४ रहिवासी अफगाणिस्तानमधील आयएसकेपी मध्ये दाखल झाले होते. या १४ जणांपैकी १३ जणांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. तर हे १३ जण अद्यापही फरार आहेत. २०१४ मध्ये मोसूलमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा झाल्यानंतर मलप्पुरम, कासरगोड आणि कन्नुर जिल्ह्यातील एक समूह जिहाद्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सोडून गेला होता. यामधील काही कुटुंबांनी आयएकेपीमधून अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात राहू लागले होते.

तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, तालिबान आणि त्यांचे सहकारी या कट्टरवाद्यांचा वापर करून भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकतात. तसेच तुर्कमेनिस्थानच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट करण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले होते. मात्र तालिबानने अद्याप या प्रकरणात मौन धारण केले आहे. मात्र गुप्त रिपोर्टनुसार २६ ऑगस्टला काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर आयईडी जप्त करण्यात आला होता.

रिपोर्टमध्ये अफगाणिस्तामधून येत असलेल्या रिपोर्टनुसार काबुल हक्कानी नेटवर्कच्या नियंत्रणाखाली आहे. कारण पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या नंगरहार प्रांतामध्ये आदिवासी बहुल भागात जादरान पश्तून जलालाबाद-काबूलमध्ये प्रभावी आहे. एचटीच्या अहवालानुसार आयएसकेपीने नंगरहार प्रांतामध्ये हक्कानी नेटवर्कसोबत काम केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.