देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 82 लाखांच्या वर ; २४ तासात ४९६ रुग्णांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासात देशात ४५,२३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.  रुग्णांचा आकडा पुन्हा वाढल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. तसेच गेल्या २४ तासात देशात ४९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशात सध्या ५ लाख ६१ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आतापर्यंत देशात एकूण १ लाख २२ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ८२ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ८२,२९,३१३ रुग्ण सापडले आहेत.  त्यापैकी १,२२,६०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ७५,४४,७९८ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ५,६१,३८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.