महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोने-चांदीच्या भावात वाढ ; जाणून घ्या आजचा दर

0

नवी दिल्ली : युरोपात पुन्हा एकदा करोना व्हायरसने डोकेवर काढले आहे. फ्रान्ससह इतर देशांत करोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने गुण्यतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घडामोडी कमॉडिटी बाजारावर परिणामकारक ठरणार आहेत.

 

दरम्यान, सोने आणि चांदीमध्ये मागील दोन सत्रात तेजी दिसून आली आहे. आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.

 

आज सकाळी बाजार उघडताच सोने ५० रुपयांनी वधारले. तर चांदीमध्ये ७५० रुपयांची वाढ झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०६७५ रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोला ६१४४३ रुपये असून त्यात ५७८ रुपयांची वाढ झाली आहे.

 

goodreturns.in या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९७० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९७० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९९२० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१९५० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४८९२० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२५४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७६२० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१९५० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.