देशमुखांच्या घरी अरेस्ट वॉरंटसह CBIचा छापा; मुलासह सुनेला होणार अटक?

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे.  देशमुख  महिन्याभरापासून अज्ञात स्थळी आहेत. देशमुखांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली तरी त्यांचा पत्ता लागत नाहीये. त्यामुळे अनिल देशमुखांचा पत्ता जाणून घेण्यासाठी सीबीआयने नवीन युक्ती लढवली आहे. सीबीआय अधिकारी देशमुखांच्या घरी अरेस्ट वॉरंटसह दाखल झाले असल्याची माहिती आहे. देशमुखांचा मुलगा आणि सून यांना सीबीआयकडून अटक होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी ८ वाजता  सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुखांच्या घरी दाखल झाले. त्यांच्याकडे अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचं वॉरंट आहे. वारंवार नोटीस पाठवूनही अनिल देशमुख चौकशीसाठी समोर आले नाहीत. न्यायालयानेही समन्स पाठवत ईडीच्या चौकशीसाठी हजर का राहत नाहीत? अशी विचारणा केली होती पण तरीही देशमुख समोर आले नाहीत.

लूक आऊट नोटीस बजावल्यानंतरही अनिल देशमुख समोर येत नसल्याने आता सीबीआयने त्यांचा मोर्चा देशमुख यांचा मुलगा आणि सुनेकडे वळवला आहे. सीबीआयचे ७ अधिकारी सकाळीच अनिल देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अनिल देशमुख संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ४ कोटी जमा झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली.

देशमुखांवर झालेल्या अनेक  खळबळजनक आरोपामुळे त्यांना गृहमंत्रिपदावरूनही पायऊतार व्हावं लागलं होतं. यानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आले. अनिल देशमुख यांच्या मुलाला आणि सुनेला अटक झाली तर ते समोर येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.