देशात करोनाबाधितांची संख्या ४७१ वर पोहचली

0

नवी दिल्ली : भारतातील कोरोना बाधितांची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. भारतात आतापर्यंत ४७१ हून जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ८० हून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरातील ५४८ जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाणार आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.