महाराष्ट्रात संचारबंदी ! काय सुरू राहणार, काय होणार बंद?

0

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्राला धडक दिली आहे. देशातीलकोरोना बाधितांचा आकडा 499 वर पोहोचला असून या व्हायरसने आतापर्यंत १० जणांचा जीव घेतला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहे. महाराष्ट्रात ९७ कोरोना बाधित आहेत. तर तीन जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्ह्णून राज्यात आजपासून संचारबंदीची लागू करण्यात आली आहे. याची घोषणा काल सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सूचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे,’ असं म्हणत त्यांनी संचारबंदीची घोषणा केली.

संचारबंदीमध्ये काय सुरू राहणार, काय होणार बंद?
– जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात येणार आहेत, त्यामुळे तुम्ही जिल्ह्याबाहेर प्रवास करू शकणार नाहीत.
– खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरंच सुरू राहतील.
– रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.
– काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली.
-जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील.
– पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील.
– कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील.
– सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील
– प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.
– घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.