अंधश्रध्देचा कळस ; तृतीयपंथीच्या शापाची अफवा अन् महिला लावताय निंबाच्या झाडाखाली दिवे…

0

प्रतिनिधी ✍ परेश पालीवाल

एका तृतीयपंथींने मृत्यूसमयी दिलेल्या कथित शापाच्या अफवा खान्देशात पसरल्यानंतर महिलांनी रविवारी, मध्यरात्रीपासून स्मशान भूमीसह घराच्या परिसरातील निंबाच्या झाडाखाली दिवे लावलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यात तृतीयपंथीने दिलेल्या शापाची कहाणी वेगवेगळी आहे. निव्वळ एका अफवेमुळे मोठ्या प्रमाणात महिला आज अंधश्रद्धेला बळी पडल्याचे चित्र होते.

कुठेतरी एका गावात हाणामारीत एक तृतीयपंथी जखमी झाल्यानंतर त्याने मृत्यूसमयी शाप दिला की, तुम्ही मला वाचवू शकणार नाही तर तुमच्या जातीतील मुले मरणार. पण शापातून मुक्‍त व्हायचे असेल तर मुलगा असलेल्या आईने स्मशानात किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावण्याची कहाणी भुसावळात पसरली होती. तर जामनेर, धरणगाव, एरंडोल तालुक्यात देखील अशीच कहाणी होती, फक्त या ठिकाणी कुठल्याही विशिष्ठ जातीला नव्हे, तर हा शाप सरसगट सर्वांसाठी होता. तर तृतीयपंथीची हत्येचे ठिकाण नेमके सांगितलेले नव्हते. या अफवेमुळे दोन्ही तालुक्यातील बहुतांश महिलांनी स्मशानभूमीसह घरा जवळील भीतीपोटी लिंबाच्या झाडाखाली दिवे लावले. दरम्यान, आज सकाळपासून देखील अशा पद्धतीचे फोन जिल्हा भरात सुरु होते.

खरच कीव येते असल्या लोकांची जे अफवेच्या अंधश्रद्धेला बळी पडतात.
सगळं जग जागतिक महामारी म्हणजे कोरोना व्हायरस कसा रोखता येईल त्याचा विचार करत आहे, आणि आपल्या समजातील काही समाजकंटक असल्या अफवा पसरवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.