दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ भुसावळात सर्वपक्षीय आंदोलन

0

भुसावळ (प्रतिनिधी) :

दिल्ली येथ झालेल्या घटनेच्या निषेधार्थ दलीत समाजाच्या विविध संघटनांमार्फत रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहरातील सर्व पक्षीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली येथे काही समाजकटंकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या संविधानाची जाळपोळ केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 13 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय मंडळींनी प्रांत कार्यालयावर निर्देशने करित प्रांताना निवेदन दिले.
संविधान जाळणार्‍या समाजकंटकांवर तत्काळ गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी प्रांताधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, रिपाई आठवले गटाचे लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, बाळा सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुन्ना सोनवणे, राष्ट्रीय मजदूर सेना व पीआरपीचे राजू डोंगरदिवे, प्रकाश निकम, दलीत पँथर जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे,अनिल इंगळे, महेंद्र सपकाळे, प्रदिप सपकाळे, दिलीप सुर्यवंशी, समाधान सोनवणे, गोविंदा साळूंखे, विजय साळवे, एससीएसटीचे गौतम शेजवळ, गोरखनाथ सुरवाडे, राजू सुरवाडे, राजेश नरवाडे, आकाश विरघट, चंद्रकांत वासनिक, रवि तांबे, बंडूदादा देशमुख, योगेश ब्राह्मणे, प्रमोद तायडे, सिध्दार्थ ब्राम्हणे, तुषार बिजागरे, विक्की वाघ, करण सपकाळे, कृष्णा खरारे, राजू तायडे, विश्वास खरात, रेखाताई निकम, चंद्रकांत देशमुख, भगवान निरभवणे, तसेच वकीलसंघ व बामसेफ तर्फे या घटनेचा निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.