मोबाईल चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

भडगाव -प्रतिनिधी

सायबर क्याफे मध्ये फॉर्म भरण्यास गेलेला तरूनानेच फॉर्म भरणाऱ्याचा मोबाईल लंपास केला. ही घटना भडगाव पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून अधिक माहिती अशी की, शहरातील बढे सर कॉम्प्लेक्स मधिल निर्मल कॉम्प्युटर चे संचालक व फिर्यादी योगेश अशोक येवले (वय-27 धंदा व्यापार) रा. मेन रोड भडगाव ) यांच्या दुकानावर आलेल्या सुशिम काशिनाथ सोनवणे रा. शिवाजीनगर भडगाव याने दुकानाच्या काऊंटर वरून फिर्यादीचा 7000 हजार रुपये किमतीचा एम आय कंपनीचा रेडमी 3s मॉडेल चा गोल्डन कलर चा मोबाईल लबाडीचा इराद्याने चोराला म्हणून आरोपी सुशिंम काशिनाथ सोनवणे याच्या विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशन ला भाग 5 गु. र. न.104/18 भा. द. वी. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक राजू सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.