दिलासादायक.. सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार स्वस्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस महागाई होत असतांना केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमाशुल्क कमी केलं आहे.

पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिफायन्ड आरबीडी पाममेल, सोयाबीन आणि सूर्यफुलावरील शुल्क 17.5 टक्के करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त केंद्राने क्रूड पाम ऑइल (सीपीओ) वरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर 20 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर आणला आहे आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल 20 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाने बुधवारी या संदर्भात दोन अधिसूचना जाहीर केल्या आहेत. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) च्या मते, सीपीओवर प्रभावी शुल्क 8.25 टक्के (24.75 टक्के आधी) आणि कच्च्या सोयाबीन तेलावर 5.5 टक्के (24.75 टक्के आधी) आणि सूर्यफूल तेलावरही आयात शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर कमी करण्यात येणार आहे. या कपातीमुळे, आरबीडी पामोलिन, रिफायन्ड सोयाबीन तेल आणि रिफायन्ड सूर्यफूल तेल यावर प्रभावी शुल्क 14 ऑक्टोबरपासून 19.25 टक्के (35.75 टक्के आधी) असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

सरकारनं पाम, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलावरील कृषी अबकरात मार्च 2022 पर्यंत घट केली आहे. याशिवाय कृषी उपकरांमध्येही घट करण्यात आली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता असून यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

 केव्हापासून लागू होणार नवा निर्णय

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डनं (सीबीआयसी) जारी केलेल्या अधिसूचनेत शुल्क कपात 14 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे आणि ही कपात 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.