दहशतवाद्यांच्या मुंबई कनेक्शनवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने  सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी हा मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दिल्ली आणि देशातील काही राज्यात दहशतवाद्यांना झालेल्या संशयित आरोपींच्या बाबतीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. मात्र ही संपुर्ण माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे. पण त्याच्यातील वस्तुस्थिती जनतेला माहिती असायला हवी, म्हणून एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल याबाबतची माहिती देणार आहेत. पण या प्रकरणात इंटेलिजन्स फेल्युअर नसल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सध्या या प्रकरणातील बारकावे सांगता येणार नाही. कारण याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. या संपुर्ण प्रकरणात एटीएसचा वॉच होता, असेही ते म्हणाले.

पोलिसांना पोलिसांच्या पद्धतीने तपास करू दिले जाणे गरजेचे आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबई येऊन कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले. बाहेरच्या राज्यात जाऊन कारवाई करताना माहिती परिपक्व असेल तर पोलिसांना सांगितले. जाते. अनेकदा माहिती गोळा करताना थेट अटक करण्यात येते असेही ते म्हणाले. दाऊद कनेक्शन, मुंबई लोकलची रेकी या सगळ्या घटनांच्या बाबतीत एटीएस प्रमुखांकडून माहिती दिली जाणार आहे.

या विषयाचे राजकारण करण्यात येऊ नये असेही ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याआधी आंदोलने करणाऱ्यांनी विचार करावा असेही ते म्हणाले. सरकारने काढलेल्या आदेशाविरोधात जाऊन आंदोलने होत असल्याबाबत त्यांनी मत मांडले. पोलिसांना स्वातंत्र्य आहे, कोणत्याही गोष्टीसाठी पोलिसांना अडकवून ठेवलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली आणि देशातील काही राज्यातून काही जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (होम), मुंबई पोलिस आयुक्त, एटीएसचे प्रमुख आणि सर्व अधिकाऱ्यांमध्ये या प्रकरणाच्या निमित्ताने आज बैठक पार पाडली. जी माहिती आवश्यक होती ती देण्यात आली आहे. जान मोहम्मद शेख (४७) या मुंबईतल्या आरोपीविरोधात २००२ मध्ये एक स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. जान मोहम्मद शेखला राजस्थानातील कोटा येथून अटक करण्यात आली आहे.

दिल्लीच्या पथकाने सणासुदीच्या काळात दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.