तिक्ष्ण हत्याराने वार; महिलेची निर्घृण हत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील तुळजाई नगर रामेश्वर कॉलनी भागात आज पहाटे एका महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे.

वंदना गोरख पाटील (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव समोर आले असून तीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती पुढे आली आहे. महिलेच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून अतिशय निघृण खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिळताच अधिकारी व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटना घडली त्या घरात महिलेचा चेहरा छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला.

सदर मयत महिलेच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून एवढा निर्घृण खून का केला असावा, देखील दृष्टीस पडल्याने एवढा निघृण खून कुणी व कशासाठी केला असावा याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.