ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात वन मजूर ठार

0

चंद्रपुर ;- जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघाने वनमजुरावर हल्ला केला आहे. पर्यटकांच्या डोळ्यासमोर या वनमजुराला वाघाने जंगलात ओढत नेले आहे. ही थरारक घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला गेट भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  वरोरा: तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर कक्ष क्रमांक 59 मध्ये निमडला गावातील रामभाऊ रामचंद्र हनवते वय वर्ष 52 हा वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे..

 

खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन रामदेगी निमडला पर्यटक गेटवर सकाळच्या सुमारास रोजंदारी सफाई कामगार रामचंद्र हनवते काम असताना कुठीच्या समोर देवबाबरीत असलेल्या वाघाने हमला करून ठार केले. हि तीन महिन्यात दूसरी घटना घडली आहे.(रामदेगी) बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत आहे.. सफाई कामगार यांना ठार करणारा वाघ हे भानुसखिंडीचा बछडा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे.

दरम्यान, ते या भागात असलेली कवठ फळे वेचत होते. या भागात भानूसखिंडी वाघिणीचा वावर आहे. भानूसखिंडी आपल्या बछड्यांसह अनेकदा या भागात फिरत असून तीचे कित्येकदा पर्यटकांना अगदी सहज दर्शन झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.