ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया बीचवर ४ भारतीयांचा बुडून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया येथील फिलिप आयलँड बीच वरती बुडून चार भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबतची माहिती सोशल मीडिया एक्स वर शेअर केली आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर मेलबर्न मधील अल्फ्रेड रुग्णालयात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

आयोगाने या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, मेलबर्न मधील भारतीय दूतावासाची टीम सर्व प्रकारच्या मदतीसाठी पिढी त्यांच्या मित्रांच्या संपर्कात आहे. त्यांनी मृतांचा कुटुंबीयांना प्रति शोक व्यक्त केला आहे. निवेदनात विक्टोरिया पोलिसांनी सांगितले की दुपारी साडेतीन वाजता अपातकालीन सेवांना एका पुरुषसह तीन महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथम सीपीआर दिला. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिण पश्चिम जंगलीतील लेण्याजवळील एका बेट वर ही दुर्घटना घडली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृतांची ओळख.पटवली जात आहे. एका अहवालानुसार मृतांपैकी तीन महिलांचे वय 20 तर पुरुषाचे वय 40 आहे त्यापैकी एक महिला पंजाब मधील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.