तर स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता

0
रेल्वे विभागाने मनपाकडे अद्यापही सादर केले नाही  अंदाजपत्रक
जळगाव- शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आल्यामुळे पर्यायी मार्गासाठी तहसील कार्यालयाजवळील देवकर निवासजवळ स्कायवॉकचा तर बळीरामपेठमधील  ब्राह्मण सभेजवळ बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करुन अंदाजपत्रक सादर करणार होते. मात्र अद्यापही  अंदाजपत्रक सादर केलेले नाही. त्यामुळे  महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात खर्च समावेश न केल्यास स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांना शहरात येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.तसेच रेल्वे रुळावरुन येतांना  चांगलीच कसरत करावी लागते. रेल्वे स्थानकातून आल्यास विना तिकीट प्रवासी म्हणून कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्यामुळे पर्यायी  व्यवस्था म्हणून  तहसील कार्यालयाजवळील देवकर निवासजवळ स्कायवॉकचा तर बळीरामपेठमधील ब्राह्मण सभेजवळ बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे.  त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधी,मनपा पदाधिकारी,रेल्वेचे अधिकारी आणि मनपा अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली.त्यानंतर अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन सोमवारी  दि.13 जानेवारीला खर्चाचे अंदाजपत्रक सादर करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली होती. मात्र अद्यापही मनपाकडे अंदाजपत्रक सादर केलेले नाही.
स्कायवॉकसाठी सव्वा चार कोटी तर बोगद्यासाठी पाऊणे सात कोटी खर्च अपेक्षित
स्कायवॉकसाठी सव्वा चार कोटी तर बोगद्यासाठी पाऊणे सात कोटी खर्च अपेक्षित आहे. खर्चाचे अंदाजपत्रक अद्यापही सादर केले गेले नाही. पुढच्या महिन्यात मनपाचे  आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. मनपाच्या अंदाजपत्रकात स्कायवॉकसाठी सव्वा चार कोटी तर बोगद्यासाठी पाऊणे सात कोटी खर्चाची तरतूद समावेश केले  जाणार आहे. मात्र रेल्वे विभागाने  अंदाजपत्रक सादर केले नाही. त्यामुळे  मनपाच्या अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद न केल्यास स्कायवॉक,बोगद्याचा प्रस्ताव रखडण्याची  शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.