तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त

0

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

चक्क  पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्रप्रदेशमधून महाराष्ट्रात येत असलेला तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये किमतीचा 11 क्विंटल 50 किलो गांजा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर रिसोड पोलिसांनी आज सेनगाव रिसोड मार्गावरून जप्त केला गुन्हेगारीच्या विश्वातील गांजा जप्त तिची विभागातील पहिलीच एवढी मोठी कारवाई रिसोड पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे.

रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग नवलकार व त्यांच्या टीमला  मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिसोड ते मराठवाड्याच्या सीमेवर रविवारी मध्यरात्रीपासून नाकाबंदी करून सेनगाव रिसोड मार्गावरून येणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी व तपासणी केली.  या दरम्यान आज आंध्रप्रदेश मधून येत असलेला टाटा आयशर ट्रक (एम एच 28 बी बी 0867) पकडण्यात आला.

कारवाईदरम्यान वाहनचालकाची चौकशी केली असता प्रारंभी वाहनचालकांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत वाहनांमध्ये पशुखाद्याची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाचे वर्णन तसेच वाहनात असलेल्या पशुखाद्य मालाची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी या वाहनातील पशुखाद्याचे संपूर्ण पोते बाहेर काढले.

यावेळी वाहनातील पशुखाद्याच्या खाली वाहनाच्या मागच्या दिशेने गांजा असलेले भरपूर पोते आढळून आले.  पोत्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजमाप केले असता तब्बल अकरा क्विंटल 50 किलो गांजा आढळून आला. सापडलेल्या मालाची अमली पदार्थाच्या विश्वात असलेली किंमत (30 हजार रुपये प्रति किलो) सामान्य नागरिकांचे डोळे चक्रावून टाकणारी आहे.  त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये आहे.

सदर  कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सारंग नवलकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, शिल्पा सगडे, सुशिल इंगळे, गुरुदेव वानखेडे, अनिल कातडे, भागवत कष्टे, संजय रंजवे, रमेश मोरे, साहेबराव मोकळे, महावीर सोनवणे, ज्ञानदेव पारवे आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.