गावठी हात भट्टीसाठी ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा वापर

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील घोड़गाव या ठिकाणी गावठी हात भट्टीची दारू तयार करणाऱ्या आणि अवैध पद्धतीने विक्री करीत असलेल्या  ठिकाणची माहिती मिळताच  ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास कुंनगर आपल्या टीमला  घेवून घोड़गाव गावातील सार्वजनिक वाचनालयाच्या पाठीमागे झाडा झुडपात गावठी दारू विक्री करीत आणि बनवत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर प्रोबिशन एक्ट 163/2021 नुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी  घोड़गाव येथे अवैध धंदे फोफावत आहेत. गावातील तरुण व्यसनाधीन होताना दिसत आहेत. म्हणून सामाजिक कार्यकर्ता किशोर दुसाने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ही तक्रार केली होती. याचा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांनी एका ग्रामपंचायत महिला सदस्याला घरात घुसुन मारहाण ही केली होती म्हणून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शनची जोडणी करून सर्रास दारू भट्टीला ग्रामपंचायतच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा अजब प्रकार बऱ्याच वर्षांपासून  सुरु होता. यावर पोलिसांनी धाड़ टाकली असता त्या ठिकाणी नवसागर, पाण्याचा ड्रम, भट्टी,आणि इतर साहित्य आढळून आले.

म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देवीदास कुंनगर यांनी लगेचच ग्रामपंचायतीला पत्र दिले. त्यात स्पष्ट खुलासा केला की, सदरील गावठाण जागा आणि अवैध नळ कनेक्शन हे ग्रामपंचायतच्या आधीन आहे.  ग्रामपंचायतने अवैध नळ कनेक्शन बंद करावे, अन्यथा तुम्हीच अवैध धंदे वाल्याना बळ देत आहे. असे  पत्रात नमूद केले आहे.

ग्रामपंचायत घोड़गावच्या ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी ही लगेचच गांवठाण जागेवरील झाड़ झुड़पे काढून साफसफाई केली आणि ते नळ कनेक्शन ही बंद केले अस पत्र पोलीस स्टेशनला ही देण्यात आले.

बऱ्याच वर्षांपासून  ग्रामपंचायतीच्या नळ कनेक्शन वरूनच पाणी वापर होत होते.  गावठी हातभट्टीची दारू ही विकली जात होती. पण कोणीही बोलायला तयार नव्हते.  ग्रामपंचायतचे ही जाणून बुजुन दुर्लक्ष होते असे लक्षात आले. असेच कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी जर लक्षपूर्वक कारवाई  करतील तर कुठेही असले चुकीचे  प्रकार होणार नाहीत आणि अवैध धंद्यांना आळा बसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.